आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सोहळ्याचा समारोप


मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताईचा 727 वा अंतर्धान समाधी सोहळा रविवारी संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज हभप केशव महाराज नामदास यांच्या उपस्थितीत झाला. या निमित्ताने रविवारी कोथळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. संत मुक्ताईच्या नामाच्या गजराने व जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

रविवारी पहाटे पाच वाजता सम्राट पाटील व श्रद्धा पाटील यांच्याहस्ते अभिषेक सोहळा पार पडला. दहा वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री विठ्ठल पादुका तर नामदेव महाराज व श्री रुक्मिणी पादुका, त्र्यंबकेश्वर येथून श्री निवृत्तीनाथ पादुका जुन्या कोथळीतील मंदिरात दाखल झाल्या. रविवारी सकाळी साडेदहा वाजता हभप श्री केशव दास नामदास संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज यांचे गुलालाचे कीर्तन झाले. दुापारी एक वाजता हभप जयवंत महाराज गोसावी (त्र्यंबकेश्वर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. या निमित्ताने नवीन मुक्ताई मंदिरावर सुद्धा 160 किलो आंब्याची आरास अजबराव पाटील यांच्यातर्फे करण्यात आली. जुन्या मंदिरात मराठवाडा, मध्यप्रदेश विदर्भ खान्देश या भागातून सुमारे 70 ते 80 दिंड्या दाखल झाल्या. रविवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा पुष्पवृष्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.



खामणे येथील ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यासोबतच आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याहस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली. सायंकाळी सात वाजता नगर प्रदक्षिणा करण्यात आली. त्यात निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे वंशज परंपरागत पुजारी व विश्वस्त हभप जयंत महाराज गोसावी यांचे कीर्तन झाले. पालखी सोहळा पत्रकार सूर्यकांत भिसे यांच्या नेतृत्वात नऊ जणांच्या समितीसह मुक्ताईनगर येथे दाखल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !