लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाड्यांच्या फेर्‍या वाढवल्या


भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच विशेष गाड्यांची मागणी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडीच्या 16 अतिरिक्त फेर्‍या वाढवल्या आहेत.

ट्रेन क्रमांक 05326 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी आता 2 जुन ऐवजी 10 जून पर्यंत वाढवण्यात आली असून तिच्या आठ फेर्‍या होतील तर ट्रेन क्रमांक 05325 गोरखपुर-लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेष गाडी 31 मे ऐवजी आता 8 जून पर्यंत धावणार असून तिच्यादेखील आठ फेर्‍या होतील. वरील गाडीच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !