लोकसभा निवडणूक : जळगावात स्मिता वाघ तर रावेरात रक्षा खडसे आघाडीवर


जळगाव : जळगावसह रावेर लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर मंगळवार, 4 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन्ही जागांवर सुरूवातीपासून भाजपाच्या उमेदवार आघाडीवर आहेत. ताज्या आकडेवारीनुसार स्मिता वाघ 71327 तर रक्षा खडसे 74458 मतांनी आघाडीवर आहेत.

दोन्ही जागांवर भाजपा आघाडीवर
चौथ्या फेरीअखेर जळगावात स्मिता वाघ यांनी 50 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना एक लाख 87 हजार 458 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना एक लाख दोन हजार 138 मते मिळाली आहेत. स्मिता वाघ 70 हजाराची आघाडीवर आहेत.


जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिता वाघ व करण पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच झालेली दिसून येत आहे. जळगाव मतदार संघात मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. त्यांना करण पवार यांच्या पेक्षा दुप्पट मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी स्मिता वाघ 70 हजाराची आघाडीवर आहेत.

रावेर लोकसभेतील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांना 1 लाख 45 हजार 769 मते मिळाली असून श्रीराम पाटील यांना 78 हजार 582 मते मिळाली आहेत. रक्षा खडसे यांनी 67 हजार 187 मतांनी आघाडी घेतली आहे. रक्षा खडसे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे श्रीराम पाटील हे पिछाडीवर आहेत. रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्यात होणारी लढत मोठी रंजक ठरेल अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे. जळगाव व रावेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !