रावेर लोकसभेची मतमोजणी श्रीराम पाटील यांनी थांबवली : निवडणूक आयोगाकडे तक्रार


जळगाव :  जळगाव व रावेर लोकसभेच्या निवडणुकीची जळगावात मतमोजणी सुरू असताना रावेर लोकसभेतील महाविकास आघाडीतील उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मशीनच्या बॅटरीवर आक्षेप घेत मतमोजणी थांबवल्याने खळबळ उडाली आहे. ईव्हीएम मशीनची बॅटरी (कंट्रोलर पॅट) 99 टक्के कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जळगाव निवडणूक प्रशासनाकडे त्यांनी लेखी अर्ज दिला आहे.

बॅटरीवर उपस्थित केली शंका
मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी 99 टक्के कशी ? अशी शंका उपस्थित करीत श्रीराम पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी थांबवली आहे. रावेर मतदार संघात तिसर्‍या फेरीची मतमोजणी सुरू असून भाजपच्या रक्षा खडसे यांचे मत्ताधिक्य वाढत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मतदान यंत्रावर शंका उपस्थित करण्यात आली आहे.


मतदान यंत्रे एवढ्या दिवसांपासून ठेवूनदेखील त्यांची बॅटरी 99 टक्के कशी आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली. ज्या मतदान यंत्राची बॅटरी 99 टक्के आहे, त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

रक्षा खडसे यांचा विजय निश्चित : आमदार एकनाथराव खडसे
सहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना जवळपास 75 हजाराने लीड मिळालेला आहे. अजून 23 फेर्‍यापर्यंत जायचं आहे. कदाचित हा लीड अडीच लाखापर्यंत जाऊ शकेल आणि हे चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे. विरोधकांचे संतुलन बिघडलेलं त्या ठिकाणी दिसत आहे. कालच काँग्रेसचे नेत्यांनी जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका त्यानुसार यांनी गोंधळ घालायचं केलेलं ठरवत दिसतंय असे मत एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !