आमदार सावकारे परिवाराला धमकीचा निषेध : वाय प्लस सुरक्षेची मागणी

भुसावळातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ : भुसावळचे आमादार संजय सावकारे यांचे बंधू तथा कॉटन सेल संचालक प्रमोद सावकारे यांना फोनवरून अज्ञाताने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच त्यांच्या परिवरातील सदस्यांचाही उल्लेखही धमकीत केल्याने या प्रकाराचा स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी निषेध करीत सोमवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देत सावकारे कुटूंबियांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली तसेच भुसावळातील दुहेरी हत्याकांडाचा निषेध नोंदवत मारेकर्‍यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

फोनवर दिले ठार मारण्याची धमकी
भुसावळात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची बुधवार, 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर बारसे कुटूंबियांकडे द्वार दर्शनासाठी प्रमोद सावकारे हे गेल्यानंतर शनिवार, 1 जून रोजी दुपारी त्यांना अज्ञाताने तब्बल आठ ते नऊ वेळा मोबाईलवर कॉल करून
ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर प्रमोद सावकारे यांनी बाजारपेठ पोलिसात संशयीताविरोधात तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाअंती संशयीताला नेपानगर येथून रविवारी ताब्यात घेतले होते.


हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
प्रमोद सावकारे तसेच त्यांचे बंधू आमदार संजय सावकारेंचेही नाव घेवून त्यांनाही पाहून घेवू, असा संशयीतांना केला. आरोपीने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सावकारे बंधूंना वाय प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी करुन भाजपने बारसे, राखुंडे हत्याकांडाचा निषेध केला. दोघांच्या मारेकर्‍यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, असा तपास करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शहरात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, असे निवेदनात नमूद आहे.

यांची निवेदन देतानाा उपस्थिती
निवेदन देताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, सरचिटणीस श्रेयस इंगळे, जयंतीलाल सुराणा, अ‍ॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन, प्रमोद नेमाडे, पवनकुमार बुंदेले, खुशाल जोशी यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकार्‍यांच्या व माजी नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेदेखील यावेळी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !