20 किमी सायकलिंग करीत साजरा केला जागतिक सायकल दिवस
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी 20 किलोमीटर सायकलिंग करीत जागतिक सायकल दिवस साजरा केला. 3 जून हा दिवस संपूर्ण जगात सायकल डे म्हणून ओळखला जातो. आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सायकलिंगचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी सायकलप्रती सामान्य नागरिकांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भुसावळ ते कुर्हा असे 20 किमी अंतराची सायकलिंग आयोजित केली.
यांचा स्पर्धेत सहभाग
सोमवारी सकाळी सहा वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून ते जामनेर रोडवरील कुर्हा गावापर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा मार्ग ठरवण्यात आला. या उपक्रमात प्रवीण फालक, गणसिंग पाटील, भाऊसाहेब पाटील, डॉ.महेश फिरके, दिलीप जोनवाल, राजेंद्र ठाकूर, प्रमोद शुक्ला, समीर चौधरी, जगदीश रेहपाडे, ज्ञानेश धांडे, हर्षमान दिलीप जोनवाल, विरेश विनोद बटाव, श्रेयस जगदीश अत्तरदे, राजपालसिंग राजपूत, प्रवीण पाटील या पुरुष सदस्यांसोबतच मंजू शुक्ला व माया पवार या महिलांनी देखील यशस्वी सहभाग नोंदविला.

