भोळे महाविद्यालयातील निशांत ढाकेला नीट परीक्षेत 653 गुण : प्राचार्यांनी केला गौरव


भुसावळ : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थी निशांत चंद्रकांत ढाके यास नीट परीक्षेत 700 पैकी 653 गुण प्राप्त केले. अखिल भारतीय रँक 12061 असून बारावी विज्ञान परीक्षेत सुद्धा 85.83 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. निशांत यास लहानपणापासून डॉक्टर बनायचे स्वप्न आहे. प्राचार्य डॉ.राजू फालक व प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाल नियमित 8 ते 10 तास अभ्यास केला तसेच आई, वडील व काका डॉ.राजेश ढाके यांचे मार्गदर्शन लाभले, असे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !