क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची राज्यमंत्री रक्षा खडसेंनी सांभाळली धूरा


मुंबई : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार रक्षाताई खडसे यांनी रविवारी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सायंकाळी क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची धुरा सांभाळली. त्यांनी भारताला क्रीडा क्षेत्रात पॉवर हाऊस तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

प्रीतम मुंडेची पोस्ट चर्चेत
भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रीतम मुंडे यांनी रक्षा खडसे यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.


प्रीतम मुंडे यांची पोस्ट जशीची तशी..
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणार्‍या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणार्‍या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणार्‍या. 10 वर्ष सतत संसदेत शेजारी बसणार्‍या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणार्‍या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणार्‍या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणार्‍या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणार्‍या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !