चैन्नई-जोधपूर एक्सप्रेस एलएचबी कोचसह धावणार !


भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून चैन्नई जोधपूर एक्सप्रेसच्या (अप आणि डाउन दिशा) पारंपारिक आईसीएफ डब्यांचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

22663 चैन्नई-जोधपूर एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह शनिवार, 8 जूनपासून चालविण्यात येत आहे तर 22664 जोधपूर -चैनई एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह मंगळवार, 11 जूनपासून चालविण्यात येत आहे. या गाडीला एकूण 22 डबे असतील. एक वातानुकूलित – द्वितीय, 11 वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह दोन जनरल सेकंड क्लास एलएचबी डबे आहे. आईसीएफ डबे एलएचबी डब्यांसह बदलणे हे प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याच्या दिशेने रेल्वेचे आणखी एक पाऊल आहे. असे रेल्वेने कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !