वाळूचा भरधाव ट्रक झोपडीत शिरल्याने एकाच कुटूंबातील आठ जण जागीच ठार


नवी दिल्ली : वाळूने भरलेला भरधाव ट्रक झोपडीत शिरल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशात हरदोई येथे घडली. मृतांमध्ये पती-पत्नी, चार मुले, जावई आणि नातवंडांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रक चालक आणि हेल्परला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्री दीड वाजता मल्लवन येथील जकात नाका क्रमांक दोनवर हा अपघात झाला.

यांचा झाला मृतयू
अवधेश (45), त्यांची पत्नी सुधा (42), सुनैना (11), लल्ला (5), बुद्ध (4) आणि जावई करण (25), त्यांची पत्नी हिरो (22) आणि मुलगी कोमल (5) अशी मृतांची नावे आहेत.



तरुणी रुग्णालयात दाखल : प्रकृती चिंताजनक
ट्रक जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. बिट्टू या जखमी मुलीला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास करण्यात येत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !