भुसावळात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ : शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राजपूत समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. पु.ओं.कॉलेजपासून संध्याकाळी सात वाजेला मिरवणुकीला सुरुवात झाली. सजवलेल्या बग्गीत महाराणा प्रताप यांची प्रतिमा ठेवण्यात आली तर महाराणा प्रताप यांच्या सजीव देखावा या मिरवणुकीत सादर करण्यात आला. घोड्यावर बसलेले महाराणा प्रताप यांची भूमिका सायली राजपूत तर महाराणी यांच्या भूमिकेत चैताली राजपूत हिने भूमिका वठवली.
महिला-पुरूषांचा लक्षणीय सहभाग
प्रा.समाधान महाजन यांनी महाराणा प्रताप यांचे प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात केली. मिरवणूक विशेषतः समाजातील सर्व महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या तर पुरुषांनी भगवे फेटे घातले होते. मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नाहाटा कॉलेजपासून सुरू झाल्यानंतर जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरुन वसंत टाकीज जवळील महाराणा प्रताप यांच्या स्मारकाजवळ आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला.

महाराणा प्रताप की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीसाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष दीपाली पाटील, प्रदेश सचिव कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत, महिला जिल्हाध्यक्ष सारीका पाटील, युवा जिल्हाध्यक्ष संदीप राणा, जिल्हा सचिव मीना राजपूत, तालुका अध्यक्ष कविता राजपूत, जयंती समिती अध्यक्ष विकी राजपूत, महिला समिती अध्यक्ष प्रमिला राजपूत, समिती उपाध्यक्ष संध्या बोदर, हर्षल बोदर यांच्यासह सर्व राजपूत समाजातील कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.




