भुसावळात उद्या क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे होणार जंगी स्वागत !
भुसावळ : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्या शनिवार, 15 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. रक्षा खडसे यांचे शनिवारी पहाटे 5.25 वाजता मुंबईहून पहाटे हावडा मेलने रेल्वेने भुसावळला आगमन होईल.
यावेळी रेल्वे स्थानकावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर मंत्री खडसे या मुक्ताईनगरला रवाना होतील. या ठिकाणी सकाळी आठ वाजता त्यांचे रॅली काढून स्वागत केले जाईल तर सकाळी 10 ते दुपारी दोन वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्या गोदावरी संवाद साधणार असून त्यांचा जंगी सत्कारही केला जाणार आहे.





