दहिगावात वादळाने भिंत कोसळली : सुदैवाने अनर्थ टळला


यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकातील ज्ञानेश्वर रमेश पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची भिंत बाजूला असलेले विकास नारायण पाटील यांच्या घरावर पडली. त्यांचे घर ही पडले. या घटनेत त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले व चीजवस्तू दबून नुकसान झाले. त्यांची आई निंबाबाई नारायण पाटील या सुदैवाने बचावल्या. ही घटना दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच देविदास पाटील, भाजपाचे कार्यकर्ते मयूर पाटील, नितीन पाटील, एस.के.पाटील आदींनी भेटी देऊन पाहणी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !