सिल्लोडच्या लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरात सापडले कोट्यवधींचे घबाड


सिल्लोड : सिल्लोडचा दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील याला एसीबीने 2 मार्च रोजी पकडल्यानंतर त्याच्या घर झडतीत एक कोटी 36 लाख 77 हजारांची रोकड आणि 28 तोळे सोन्याच्या दागिन्यांचे घबाडही सापडले आहे. पाटील याने भ्रष्ट व गैरमार्गाने एक कोटी 80 लाख 80 हजार 155 रुपयांची मालमत्ता जमवली होती. मालमत्ता संपादीत करण्यासाठी त्याची पत्नीनेही मदत केल्याचे तपासात समोर आल्याने शुक्रवारी दोघांविरूध्द बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यक निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत होता. त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळल्याने त्यांना निलंबनाचे आदेश काढण्यात आले मात्र निलंबन आदेशाची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.


धान्याच्या कोठ्यातही सापडले होते पैसे
एसीबीने पाटील याला घेऊन त्याच्या घराची झडती सुरु केल्यानंतर त्याच्या घरात धान्याच्या कोठ्यामध्ये तसेच पाच जुन्या बॅगांमध्ये पाचशेच्या नोटांची बंडले सापडली होती. पथकाने बेसिनजवळ पहिले तेव्हा बेसीनखाली देखील त्याने रोकड लपविली होती. त्याला मिळालेली पैशांची पाकिटे आली तशीच घरात पडून होती. घमेल्यात देखील नोटाच नोटा दिसून आल्या होत्या.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !