ढोल-ताशांच्या गजरात व गुलाबपुष्पाने झाले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात : रांगोळी, पतांकांनी सजले शाळांचे प्रांगण : पहिल्याच दिवशी मिळाली पुसतके


The students were welcomed with the sound of drums and flowers भुसावळ : नवीन शैक्षणिक पर्वाला शनिवार, 15 जूनपासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांना शाळेची गोडी वाढण्यासाठी ठिकाठिकाणी बैलगाडीतून मिरवणूक, गुलाबपुष्पाने स्वागत करून औक्षण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात झालेले स्वागत व व पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी सुखावले. प्रसंगी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून त्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून गोड-धोड खायला देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची आता शाळेप्रती गोडी अधिक वाढणार असून विद्यार्थ्यांना आता गणवेशाची प्रतीक्षा आहे.

यावल तालुक्यात पहिल्याच दिवशी मिळाली पुस्तके
यावल : राज्यातील शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. यावल तालुक्यातील सुरू झालेल्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही लक्ष वेधणारी ठरली. यावेळी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 140 शाळा असून 452 ही शिक्षकांची संख्या आहे. शनिवार, 15 जुनपासून 2024 च्या शैक्षणीक सत्राला सुरूवात झाली. यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत तालुक्यातील 22 शाळांमध्ये शाळापूर्व तयारी संदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. निमगाव, ता.यावल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके व मुख्याध्यापक अय्युब तडवी, त्याचप्रमाणे अंजाळे, ता.यावल येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नमाला चौधरी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्य देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पोषण आहार आणी शालेय पुस्तके वाटप करण्यात आली. यावल तालुक्यातील 44 जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये शाळा पूर्व तयारीचे मेळावे आयोजित करण्यात आले. या उपक्रमात गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख सहभागी झाले.



शारदा विद्या मंदिर, साकळी

यावल : यावल तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासह गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रशस्तीपत्र व बुके देऊन गौरवण्यात आले. साकळी, ता.यावल येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक मुख्तार सरदार तडवी होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा विद्या वसंतराव महाजन, उपाध्यक्ष सुभाष भास्करराव महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, संचालक श्यामकांत महाजन, सुनंदाताई बडगुजर सह सर्व संचालक मंडळ,प्राचार्य आर. जे. महाजन, पर्यवेक्षक एस. जे. पवार, बी. ई. महाजन, सदाशिव निळे, एन. पी. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. जे. महाजन यांनी केले.तर शैक्षणीक वर्षात शाळेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर अहवाल वाचन एम. ए. महाजन यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी निशा बाळू चित्रे, मनोहर वासुदेव बडगुजर,उपशिक्षक बी ई महाजन,संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई महाजन, उपाध्यक्ष सुभाष महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक मुख्तार सरदार तडवी यांनी संस्थेचा वाढता आलेख, गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा, ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. पी. पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. जे. पवार यांनी मानले.

धनाजी नाना विदयालयात शाळा प्रवेशोत्सव
सावदा : खिरोदा.ता.रावेर येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेतील सर्व वर्गखोल्या, आवाराची स्वच्छता करून रांगोळी पताकांनी शाळेची सजावट करण्यात आली. पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बॅण्डच्या तालावर मिरवणूक काढून तसेच गुलाबपुष्प व औक्षण करून करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे स्वागत करीत नव्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शाळेमार्फत मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांच्याहस्ते वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षक एस.पी.चौधरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मेहता हिंदी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात

भुसावळ : हिंदी सेवा मंडळाद्वारा संचलित श्री.र.नं.मेहता हिंदी प्राथमिक विद्या मंदिर तथा छात्रस्मृती भवनात विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रधानाध्यापिका रीता शर्मा पालक प्रतिनिधी तेज पाल उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देण्यात आले.तसेच पालकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. शासनाकडून देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन याविषयी विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेतली. पालकांना व विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले तसेच संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सर्वांनी हात स्वच्छ धुतले पाहिजे याविषयीची जाणीव जागृती करण्यात आली. यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उमेश खोडपे तर आभार दीपक तेली सर यांनी मानले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !