भाजपा जैन प्रकोष्ठतर्फे केंद्रीय राज्य क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार


मुक्ताईनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात खान्देशातून एकमेव खासदार रक्षा खडसे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी नुकतीच राज्य मंत्री पदाची शपथ घेतली. खासदार खडसे यांनी राज्य क्रीडा व युवा कल्याण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरूच आहे. रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत भाजपा जैन प्रकोष्ठचे भुसावळ विधानसभा समन्वयक चेतन जैन, आशिष रोकडे (नांदुरा), संजय जैन (चोपडा), राजकुमार जैन (रावेर) यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेत त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.

देश व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जैन समाजाचे योगदान नेहमीच अग्रगण्य राहिले असल्याचे मंत्री खडसे यावेळी म्हणाल्या. भाजपा पदाधिकारी आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !