डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
फैजपूर : वै.डिंगम्बर महाराज चिनावलकर पायीदिंडीचे पंढरपूरकडे खानापूर येथून प्रस्थान झाले. डिगंबर महाराज मठ संस्था पंढरपूरचे अध्यक्ष तथा यावल शेतकी संघ सभापती नरेंद्र विष्णू नारखेडे यांच्याहस्ते श्रीराम मंदिरात पूजा व वीणा पूजन करून आषाढी वारी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. दिंडी परंपरा सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर या परंपरेतील वै.डिगंबर हाराज चिनावलकर यांनी सुरू केले. ती पुढे विठ्ठल महाराज, हंबर्डीकर यांनी चालवल. पुढच्या काळात वै.अरुण महाराज बोरखेडेकर यांनी दिंडीची पुनर्रचना करून नेतृत्व केले. सद्यस्थितीत हभप दुर्गादास महाराज, नेहेते हे दिंडीचे चालक आहे.
पहिला मुक्काम चिनावलला
चिनावल येथे दिंडीचा पहिला मुक्काम असून दुसर्या दिवशी रोझोदा येथे मुक्काम असेल. खिरोदा, कलमोडा, बोरखेडे , न्हावीमार्गे हंबर्डीहुन दिंडी बामनोद, भुसावळ, खडका, जामनेर, सिल्लोड, भोकरदन, जालना, बीड, बार्शीमार्गे पंढरपूरात दाखल होणार आहे. दिंड डिगंबर महाराज मठात स्थिरावेल. वारकर्यांच्या व्यवस्थेचे काम सुरू असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, कोषाध्यक्ष किशोर बोरोळे व विश्वस्त मंडळाने दिली. दिंडीचे 41 वे वर्ष असून विणेकरी भगवंत महाराज, चौधरी (खानापूर) यांची अखंड 41 वर्ष सेवा झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचा यावेळी सत्कार केला. यावेळी नितीन महाराज, खिर्डीकर, भूषण नारखेडे , शेखर भागवत चौधरी, धनराज महाराज तसेच खानापूर, चिनावल, रोझोदा, खिरोदा येथील भाविक सहभागी होत आहे.

