प्रा.डॉ.दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळावर जळगाव जिल्हा संघटकपदी


भुसावळ : सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या व्यसनमुक्तीचे कार्य करणार्‍या संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटकपदी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे भौतीकशास्त्र विभाग प्रमुख आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक तसेच विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथे आयोजित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या संघटकांच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक अमोल मडामे यांनी प्रा.डॉ.दयाघन राणे यांना नियुक्ती पत्र दिले.

व्यसनांपासून परावृत्त करणार : प्रा.राणे
व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांना समुपदेशन आणि उपचार या माध्यमातून व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करण्यासाठी शाळा कॉलेजेस आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रचार कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करून निर्व्यसनी तरुण पिढी निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !