मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथराव खडसेंचे पॅचअप होणार : पालकमंत्र्यांना विश्वास
जळगाव : मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील विळा-भोपळ्याचे नाते राज्यभरात सर्वश्रृत आहे मात्र दोघा नेत्यांनी वाद सोडून एकत्र यावे, असे आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले आहे. यापूर्वी आमदार खडसे यांच्या स्नुषा मात्री खडसे यांनीदेखील दोघे नेते एकत्र यावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे म्हटले होते.
राजकारणात कायमस्वरुपी विरोध नसतो
सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले की, राजकारणात विरोधक केव्हाही एकमेकांचे कायमस्वरुपी विरोधक नसतात. आज मित्र असणारे उद्या विरोधक होतात आणि विरोधक असणारे मित्र होतात.

एकमेकांवर टीका करताना हे दोन्ही नेते अगदी खालची पातळी गाठतात. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून पुन्हा भाजपत येणार आहेत पण त्यांचा प्रवेश सोहळा अनेक महिन्यांपासून थांबला आहे. हे दोन्ही नेते लवकरच एकत्र येतील, तथापि त्यांना एकत्र यआणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पार पाडतील, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.




