सामूहिक विवाह सोहळ्यात 53 जोडप्यांचे शुभमंगल

मुक्ताईनगर शहरात प्रवज्या फाऊंडेशनतर्फे आयोजन


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील प्रव्रज्या फाउंडेशनतर्फे आयोजित बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 53 जोडपी विवाहबद्ध झाली. रविवार, 16 जून रोजी मुक्ताईनगर शहरातील नागेश्वर मंगल भवन, जुने गावात येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी साहित्यीक अ.फ.भालेराव, सिद्धेश इलेक्ट्रोमेक कंपनीचे संचालक दीपरत्न तायडे, समाज कल्याण अधिकारी शीला अडकमोल, बी.डी.गवई, सेवानिवृत्त बँक मॅनेजर एन.जी. शेजाळे, सावदा येथील माजी नगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी मेढे, प्रतिभा मोरे, श्रीराम पोहेकर, प्रोटॉनचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन पेंशनर्स संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष आर.बी.परदेशी आदींची उपस्थिती होती. प्रसंगी मंचावर डॉ.शिवाजी चौधरी, मुस्लिम मन्यार बिरादरीचे हकिम चौधरी, माजी पोलीस पाटील मोहन मेढे, उत्तम सुरवाडे, चेतन झनके, विशाल झनके, भागवत विठ्ठल पाटील, अशोक निकम, नितीन बोदडे, राजेंद्र अटकाळे, संघरत्न दामोदरे, युवराज नरवाडे, सुरेश जोहरे, मनोहर बाविस्कर, आनंद जाधव, राजेंद्र बावस्कर, आर.बी.परदेशी, मनोज वानखेडे, रातू वानखेडे, सिद्धार्थ हिरोळे, राज्य संघटक बहुजन मुक्ती पार्टी प्रमोद सौंदळे, प्रमोद पोहेकर, चंद्रमणी इंगळे, जनार्दन बोदडे, महेंद्र लोंढे, सदाशीव निकम, दीपक इंगळे, विद्या बोदडे, जयश्री गाढे, उत्तम प्रधान, ईश्वर पोहेकर, सतीश म्हसाने, प्रसेनजीत तायडे व इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचलन दीपक इंगळे यांनी तर प्रास्ताविक प्रवज्या फाउंडेशनचे अध्यक्ष सारीपुत्र गाढे यांनी केले. आभार सचिव नितीन गाढे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !