भुसावळ शहरात उद्या योग दिनानिमित्त 14 ठिकाणी कार्यक्रम


भुसावळ : भुसावळ शहरातील विविध सामाजिक संघटना योग संघटना व क्रीडा भारती यांच्या समन्वयाने शुक्रवार, 21 जून रोजी शहरात विविध ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगप्रेमी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी आपल्या जवळच्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन जागतिक योग दिवस साजरा करावा, असे आवाहन क्रीडा भारती शाखा भुसावळ यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.

असे आहेत कार्यक्रम
शहरातील तेरापंथ भवनात सकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान महिला पतंजली भारत स्वाभिमान योग समितीतर्फे कार्यक्रम होईल. एपीएस फिटनेस सेंटरतर्फे कमल गणपती हॉलमध्ये सकाळी 7.30 ते 8.30 तर भुसावळ स्पोटर्स व रनर्स असो.तर्फे कोरोनेशन क्लबमध्ये सकाळी 6 ते 7 कार्यक्रम होईल. ताप्ती योगा क्लब (महिला) तर्फे शहरातील ताप्ती स्कूल सकाळी 5.45 ते 6.45 तसेच प्रजापिता ब्रहयाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे डॉ.आंबेडकर मैदानाच्या बाजूला सकाळी 6 ते 7 व स्वास्थ्य योग केंद्रातर्फे संतोषी माता मंदीर, लकीभा नगर येथे 8 ते 9 व क्रीडा भारतीतर्फे जुगा देवी येथे सकाळी 6 ते 7 व अद्वैतानंद योग केंद्रातर्फे रामानंद हॉल, जळगाव रोड येथे संध्याकाळी 5.30 ते 6.30 तसेच मातृभूमी क्रीडा मंडळातर्फे संतोषी माता हॉलशेजारी संध्याकाळी 7 ते 8 तसेच सिल्वर लाईन स्पोटर्स क्लबतर्फे लिलाई हॉलमध्ये सकाळी 6 ते 7, जेसीआय, प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे संतोषी माता हॉलमध्ये सकाळी 7 ते 8, राधाकृष्ण प्रभात फेरी व रोटरी रेल सिटी प्रणिता प्रतिष्ठानतर्फे व्यंकटेश मंदीर 6.30 ते 7.30 दरम्यान कार्यक्रम होईल. सिंधू सभातर्फे आदर्श विद्यालयात सकाळी 7 ते 8 व जेके कराटे क्लबतर्फे कमल गणपती हॉलमध्ये संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान कार्यक्रम होईल. कार्यक्रमात सहभागाचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !