भुसावळ रेल्वे स्थानकावरील दादागिरीचा बीमोड करणर : भुसावळ लोहमार्गचे नूतन निरीक्षक सुधीर धायरकर


भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी रत्नागिरी येथून पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी नियुक्ती झाली असून धायरकर यांनी शुक्रवारी निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला.

रेल्वेतील चोर्‍या, रेल्वे स्थानकावरील गुन्हेगारांची दादागिरीविरूध्द कायद्याचा प्रभावी वापर करून धडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे निरीक्षक धायरकर यांनी सांगितले. तत्कालीन निरीक्षक विजय घेर्डे यांची बदी झाल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात निरीक्षकपद रिक्त होते. या रिक्त जागेवर धायरकर यांची नियुक्ती करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !