आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ ऑर्डनन्समध्ये विविध कार्यक्रम


भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या मुलांसाठी सीनियर क्लब येथे दुपारी 3.30 मिनिटाला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक घराच्या अंगणामध्ये योगा अंतर्गत सकाळी सहा ते सात काहींनी संध्याकाळी चार ते सहा च्या वेळात योग अभ्यास केला.

विविध कार्यक्रमाचे आयोजन
21 जून रोजी सामूहिक योग अभ्यास सकाळी सहा ते सात या वेळात आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील पहिला , दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावणार्‍या मुलांना आणि मुलींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यकारी निदेशक विनीत शर्मा म्हणाले की, फॅक्टरीमधील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक दिवशी योग करायला पाहिजे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे बॅलेंसिंग पावर वाढवणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. योग अभ्यास योग प्रशिक्षक मधुकर एस.राऊत यांनी करून घेतला. सर्व कमृचारी तसेच युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जेसीएम मेंबर, कार्य समिती सदस्य उपस्थित होते. आभार कनिष्ठ कार्यशाळा प्रबंधक एस.आर.पाटील यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !