रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : दहा विशेष रेल्वे गाडीच्या कालावधीत वाढ


भुसावळ  प्रवाशांच्या सोयीसाठी दहा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

या गाडीला मिळाली मुदतवाढ
त्यात ट्रेन क्रमांक 09520 ओखा-मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ तर ट्रेन क्रमांक 09519 मदुराई-ओखा साप्ताहिक विशेष गाडीला 3 जानेवारी 2025 तसेच ट्रेन क्रमांक 09059 सुरत-ब्रह्मपुर साप्ताहिक गाडीला 31 जुलैपर्यंत, ट्रेन क्रमांक 09060 ब्रह्मपुर-सुरत साप्ताहिक गाडीला 2 ऑगस्टपर्यंत, ट्रेन क्रमांक 09025 बलसाड़-दानापुर साप्ताहिक विशेष गाडीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ट्रेन क्रमांक 09026 दानापूर-बलसाड साप्ताहिक विशेष गाडीला 1 ऑक्टोबरपर्यंत तसेच ट्रेन क्रमांक 09045 उधना-पटना साप्ताहिक विशेष गाडीला 27 सप्टेंबरपर्यंत, ट्रेन क्रमांक 09046 पटना-उधना साप्ताहिक विशेष गाडीला 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ट्रेन क्रमांक 09033 उधना-बरोनी साप्ताहिक विशेष गाडीला 30 डिसेंबरपर्यंत तर ट्रेन क्रमांक 09034 बरोनी-उधना साप्ताहिक गाडीला 1 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ट्रेनची वेळ व थांबा यात बदल नाही. रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !