जळगाव जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
भुसावळ : राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल (आस्थापना) यांनी राज्यभरातील विहित कालावधी पूर्ण झालेल्या तसेच विनंती म्हणून 420 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन अधिकार्यांचा समावेश आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
राज्यातील तीनशे सहायक पोलीस निरीक्षकांच्या विहित कालावधी पूर्ण झाल्याने तर 120 अधिकार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील जालिंदर पळे, विशाल जयसिंग टकले आणि संदीप दुनगहू या तीन अधिकार्यांचा समावेश आहे.

सावद्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर आली तर विशाल टकले यांची पुणे शहर तर मुक्ताईनगरचे संदीप दुनगहू यांची छत्रपती संभाजी नगर परिमंडळात बदली करण्यात आली. दरम्यान, अधिकार्यांनी पदभार सोडल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षकांकडून येथे लवकरच अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येईल.