भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजकपदी डॉ.प्रियदर्शनी सरोदे


सावदा : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या जळगाव (पूर्व) जिल्हा संयोजकपदी सावदा येथील प्रसुतीतज्ञ डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती त्यांना प्रदान करण्यात आले. डॉ.सरोदे या माजी खासदार स्व. गुणवंतरावजी सरोदे यांच्या स्नुषा असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. राजकारण तसेच समाजकारणात हिरीरीने सहभाग घेणार्‍या डॉ.सरोदे यांच्या निवडीने ओबीसी मोर्चाच्या महिला आघाडीस बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश ओबीसी मोर्चाचे सदस्य भरत महाजन यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रदेश सदस्य भरत महाजन यांच्यासह राष्ट्रीय परिषदेचे डॉ.अतुल सरोदे, वाघोदा बु॥ येथील ओबीसी मोर्चाचे संजय माळी, राहुल पाटील, बाळू काकडे, सावदा शहराध्यक्ष जे.के.भारंबे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले व ओबीसी मोर्चाचे सदस्य उपस्थित होते. या निवडीबद्दल डॉ.सरोदे यांचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष पूर्व अमोल जावळे आदींनी अभिनंदन केले







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !