आक्षेपार्ह वक्तव्याची क्लीप व्हायरल : बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले
बीड : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रा.शिवराज बांगर यांच्यातील संवादात ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही एकेरी भाषेत बोलत असल्याची कथीत ऑडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल होताच गुरूवारी सायंकाळच्या सुमारास खांडे यांचे जालना रोडवरील संपर्क कार्यालय जमावाने फोडले.
बीड पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
काचा व इतर तोडफोड केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही माहिती समजताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतू कार्यालय फोडणारे कोण होते? हे अद्याप समोर आलेले नाही.





