साश्रु नयनांनी भक्ती किशोरदासजींना अखेरचा निरोप

राज्यभरातील संत-महतांची उपस्थिती : भाविकांना शोक अनावरण


फैजपूर : सावदा येथील श्री स्वामी नारायण मंदिराचे कोठारी खान्देश रत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी यांचे हृदयविकाराने शुक्रवार, 28 रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर स्वामी नारायण पंथाचे गुजरात येथील श्रीक्षेत्र वडताल धाम गोमती येथे शनिवार, 29 जून रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी भक्तांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

संत-महतांसह भाविकाचीं उपस्थिती
स्वामी नारायण पंथ संत धार्मिक परंपरेने भक्ती किशोरदासजींवर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रसंगी स.गु.शास्त्री धर्म स्वरूपदास जी, अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन महाराज, संत समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष प.पू.गोपाल चैतन्यदासजी (पाल), श्रीकृष्ण मंदिराचे सुरेश शास्त्री मानेकर (सावदा), स्वामी स्वरूपानणंद महाराज (डोंगरदे), श्याम चैतन्यजी महाराज (जामनेर), शास्त्री भक्ती स्वरूपदासजी (कोशिंदा), गुरुकूल सावदा अनंत प्रकाशदासजी, प्राचार्य संजय वाघूळदे, तेजेंद्र चौधरी, कोमल चौधरी, नंदू पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नारायण बापू चौधरी, स्वामी नारायण संप्रदयातील संत, पार्षद, भगत, कोठारी मंदिराचे विश्वस्त, हरिभक्त, विविध संप्रदयातील व अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील संत-महंत, किशोरदासजी यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होता.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !