भुसावळातील पांडूरंग वाडी, बंब कॉलनीतील भूखंड समर्पण प्रतिष्ठानला देण्यास विरोध

स्थानिक रहिवाशांनी प्रांताधिकार्‍यांना दिले ठराव रद्दसाठी निवेदन


भुसावळ  : भुसावळ पालिका हद्दीतील स.नं.123/6 ब आणि 123/4 मधील ओपन स्पेस नगरपरिषदेमार्फत समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांना ठराव करुन देण्यात आली आहे. पालिकेने हा ठराव रद्द करावा. संबधीत संस्थेला दिलेला जागा परत पालिकेने ताब्यात घेवून परिसरातील रहिवाशांच्या उपयोगासाठी वापरावी, अशी मागणी पांडुरंग वाडी, बंब कॉलनी भागातील रहिवाशांनी प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे.

समर्पण प्रतिष्ठानला भूखंड देण्यास विरोध
शिवारातील स.नं.123/6व आणि 123/4 मधील ओपन स्पेस वरील नगरपरिषद मार्फत समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान भुसावळ यांना प्रशासकीय ठराव क्रमांक 431 अन्वये 24 ऑगस्ट 2023 ला करुन देण्यात आलेला आहे. ही जागा सर्व रहिवासी यांच्या हक्काची ओपन स्पेस असून ती जागा नगरपरिषदेच्या नावे आहे. यावर वैयक्तिक अधिकार कुणाचाही नाही. ही ओपन स्पेस सर्व रहिवासी यांची असताना समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांना देण्यात आली आहे. रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता किवा विश्वासात न घेता परस्पर उपविभागीय अधिकारी, भुसावळ व मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी बैठक घेवून प्रशासकीय ठराव मंजूर केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होऊन हा ठराव रद्द करावा, अशी मागणी रहिवाशांनी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बतरा, अनिल पाटील आदींसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.


तर मालमत्ताकर माफ करा
ओपन स्पेसवर पहिला अधिकार रहिवाशांचा आहे जर रहिवाशांना ओपन स्पेस देण्याचा अधिकार नसेल सर्व रहिवाशांना नगरपरिषदेतर्फे दरवर्षीचा मालमत्ता कर हा आजीवन भरासाठी माफ करण्यात यावा, असा आदेश उपविभागीय अधिकारी भुसावळ व मुख्याधिकारी यांनी द्यावा, अशी मागणीही रहिवाशांनी निवेदनाव्दारे केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !