अनिल पाटील भाजपात आल्यास स्वागतच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Welcome if Anil Patil joins BJP : Deputy Chief Minister Devendra Fadnavis जळगाव : मंत्री अनिल पाटील हे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगावात पत्रकारांशी बोलताना केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गुरुवारी झालेल्या जिल्हा मेळाव्यात माजीमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील मंत्री अनिल पाटील हे भाजपात येणार असल्याचे सूतोवाच केले होते.
आगामी मॅच महायुतीचे जिंकणार
एका लग्न समारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले फडणवीसांनी सांगितले की, ज्या प्रकारे भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, त्याचप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीची मॅचदेखील महायुती जिंकणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. दरम्यान, मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.





