गंभीर गुन्ह्याच्या तपासाचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक : अॅड.नितीन खरे
भुसावळ : 1 जुलै 2024 पासून नवीन लागू करण्यात आलेल्या तीन फौजदारी कायद्याचे पोलिसांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून गंभीर गुन्ह्याच्या तपासाचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी दिली. ते भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. ब्रिटीशकालीन इंडियन पिनल कोड, क्रिमीनल प्रोसिजर कोड तसेच इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हे जुने कायदे रद्द करण्यात आले असून त्याची जागा आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम यांनी घेतली असून त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होत असल्याचे अॅड.खरे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात लोहमार्गचे सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस कर्मचार्यांना गुन्ह्यांचा तपास करतांना येणार्या कायदेविषयक अडचणी व त्यावरील उपाय याविषयी देखील अॅड.खरे यांनी मागदर्शन केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी एएसआय अनिता चौधरी, ए.एस.आय.सुनील साबळे, हवालदार दिवाणसिंग राजपूत, हवालदार रामकृष्ण खंडागळे, संजय चव्हाण, हवालदार श्रीकृष्ण निकम, हवालदार सुभाष निकम, हवालदार धनराज लुले, एन.पी.सी.सुलोचना कांबळे, एन.पी.सी.ज्योती साहू, राहुल गवई, गणेश शिरसाठ, परदेशी, महेश जैन, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हवालदार दिवाणसिंग यांनी परिश्रम घेतले.
