‘एक शाम शायर पत्रकारों के नाम’ मुशायरा कार्यक्रम

नॅशनल कॅरम इन्स्टिट्यूटतर्फे पत्रकारांसह मान्यवरांचा सत्कार


सावदा : सावदा शहरातील नॅशनल कॅरम इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध शायर कवी हामीद भुसावली यांच्या ‘एक शाम हामीद भुसावली के नाम’ कार्यक्रम अंतर्गत विशेष सत्कार समारंभ सावदा शहरातील डायमंड हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी मुक्ताईनगरचे शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान हातेे. उद्घाटक डायमंड इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ.हाजी हारुन शेख इक्बाल, माजी नगरसेवक गुड्डू मेंबर, माजी नगरसेवक फिरोज खान लेफ्टी, डॉ.अन्सार खान, दुबई येथील जागतिक पातळीवरील कवी संमेलन मुशायरात सहभाग नोंदविला ते सुप्रसिद्ध शायर हामीद भुसावली, सावदा परिसर पत्रकार संघ अध्यक्ष दीपक श्रावगे, दैनिक भास्करचे प्रतिनिधी तथा सावदा परिसर पत्रकार संघ कार्याध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी, सावदा परिसर पत्रकार संघाचे सचिव फरीद शेख, ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार संघ संघटनेचे संघटक युसूफ शाह होते. नॅशनल कॅरम इन्स्टिट्यूट सावदाचे प्रमुख शौकत खान लियाकत खान, शेख निसार शेख नबी, मोईन खान मोहसीन खान, शेख मुजाहिद शेख, जावेद शेख, हमीद शेख रऊफ यांनी नॅशनल कॅरम इन्स्टिट्यूटतर्फे सत्कारमूर्ती हामीद भुसावली, अफसर खान हारुन सेठ, दीपक श्रावगे, मुबारक तडवी, युसूफ शाह, फरीद शेख आदींचे शाल-पुष्पगुच्छ बुके देऊन सन्मानीत केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !