भुसावळात घर खाली न केल्याच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण


भुसावळ : घर खाली न केल्याच्या वादातून एकास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली तसेच शिविगाळ करण्यात आली. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
रामअवतार रघुनाथ लोधी (35, शिवदत्त नगर, चाहेल धाब्यामागे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत तुलसीराम रघुनाथ लोधी व दुर्गेश तुलसीराम लोधी या भावंडांनी घर खाली न केल्याच्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच त्यांच्या सून रंजना लोधी व रक्षा लोधी यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. 16 जून रोजीदेखील अंगणात प्लॅस्टीक पिशव्या उडाल्याने मला कायमच तुमचा त्रास होतो म्हणून तुम्ही लवकरात लवकर घर खाली करा, नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !