‘लाडकी बहिण’ योजनेला आता या तारखेपर्यंत मुदत वाढवली : या निकषातील लाभार्थींना मिळणार लाभ
मुंबई : ‘लाडकी बहिण’ योजनेेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्यानंतर या योजनेला आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शिवाय आता योजनेतही काही अटींबाबत सरकारने शिथीलता आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबहची घोषणा केली.
कुटुंबातील एक अविवाहित महिलाही पात्र

अर्जाची मुदत 1 जुलै ते 15 जुलै होती. ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. मात्र मानधन 1 जुलैपासूनच मिळेल.
अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला ग्राह्य.
पाच एकरच्या आत शेतीची अट रद्द.
पात्र महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे होती. ती 65 वर्षांपर्यंत वाढवली
परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पतीचा जन्म दाखला, शाळेचा टीसी, अधिवास प्रमाणपत्र दाखल केले तर ग्राह्य धरले जाईल.
पात्र कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही लाभ मिळू शकेल.
महिलांना अर्ज भरताना अडचणी; नवे नारीशक्ती दूत अॅप आणणार




