कृषीदिनानिमित्त सातपुड्यात फेकले सीडबॉल
रावेर तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनचा उपक्रम
रावेर : रावेर तालुका अॅग्रोस असोसिएशनच्या वतीने कृषीदिनानिमित्त व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्या सत्कारानिमित्ताने पाल व गारबर्डी परिसरातील ओसाड पडलेल्या टेकड्यांवर पंधरा ते वीस हजार बिया असलेले सीडबॉल टाकण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी कुर्बान तडवी यांच्यासोबत माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे, जिल्हा मोहिम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल.ए.पाटील, यावल तालुक्याचे अध्यक्ष मनोज वायकोळे, प्रशांत पाटील, नारायण भंगाळे, बेंडाळे, मुक्ताईनगरचे रामभाऊ पाटील, चोपड्याचे प्रदीप अग्रवाल, पिंटूभाऊ पवार, पालचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.महेश महाजन यांच्यासह दोन्ही तालुक्यातील कृषी विक्रेते बांधव उपस्थित होते. यावेळी गारबर्डी धरणासमोरील ओसाड पडलेल्या माळरानावर सीड बॉल टाकण्यात येऊन याबाबत मोहिम राबविण्यात आली.

कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांचा सत्कार
यावेळी सातपुडा विकास मंडळाचे संचालक धनंजय चौधरी यांनी कृषी अधीक्षक तडवी यांना शुभेच्छा देत अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या उपक्रमाबाबत अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तराळ, विजय पवार, तर कृषी विज्ञान केंद्र, पालमधील सभागृहात जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांचा अॅग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव युवराज महाजन, खजिनदार डॉ.जी.एम.बोंडे, चंद्रकांत अग्रवाल, भगवान महाजन, रवींद्र बारी, अमोल लोखंडे, प्रफुल बोंडे, मयूर कोंडे, प्रदीप महाजन, चंदन चौधरी, श्रीराम पाटील, विनोद पाटील, जितेंद्र महाजन, यादवेंद्र माळी, व्ही.एस.पाटील, धीरज पाटील, किरण महाजन, श्रीपाद जंगले, रणजीत चौधरी, भालचंद्र चौधरी आदींची उपस्थित होती. सूत्रसंचालन राहुल पाटील तर आभार मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी मानले.