न्यायालयातील तक्रार मागे न घेतल्याने रसलपूरला एकावर हल्ला : दहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा
रावेर : न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याच्या कारणावरून दहा संशयीतानी एका इसमास मारहाण करून जखमी केले. ही घटना रावेर तालुक्यातील रसलपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर 1 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा नवीन कलमाद्वारे दाखल करण्यात आला आहे.
दहा संशयीतांविरोधात दंगलीचा गुन्हा
रावेर तालुक्यातील रसलपूर येथील मोहसीन शरीफ बेग (31, बेग मोहल्ला) हे मोटारसायकलीने ग्रामपंचायती जवळून जात असतांना संशयीत फिरोज खान महेबुबखान याने अडवून थांबवले. तु आमच्यावर कोर्टात दाखल केलेली केस मागे घे, नाही घेतली तर तुला मारून टाकु अशी धमकी देऊन त्यास हातातील लोखंडी आसारीने डाव्या पायाच्या गुडग्यावर मारून जखमी केले. यावेळी शरीफखान रुस्तमखान, हानिकखान अय्याजखान, अय्याजखान मेहबुबखान, सत्तारखान अय्याजखान, शाहरुखखान अय्याजखान, शेख मोईद मुस्ताक, तैय्यबखान अश्रफखान, उमरखान रईसखान, जुबेरखान फिरोजखान यांनी चापटा व लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले. याबाबत मोहसीन बेग याने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत

