एक हजारावर रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया : डॉ.कुंदन फेगडे


यावल : विविध समाज हिताचे सामाजिक उपक्रम राबवत रावेर व यावल तालुक्यात आपल्या आश्रय फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या व कांताई या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आपण अनेक आरोग्य संदर्भातील शिबिर आयोजीत केली असून सुमारे 10 हजार रुग्णांच्या डोळ्यांची मोती बिंदूची मोफत तपासणी करण्यात आली व यातील सुमारे एक हजार रुग्णांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ऑनलाईन नोकरी मिळवून देण्यासाठी मेळाव्या आयोजीत करीत सुमारे 900 तरुण बरोजगारांना नोकरीस लावण्यात यश आल्याची माहिती डॉ.कुंदन फेगडे यांनी दिली. फैजपूर येथील शुभ दिव्य या सभागृहात आश्रय फाउंडेशन, रावेर यावल या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

या मान्यवरांची उपस्थिती
डॉ.फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने कौटुंबिक स्नेहमेळावा झाला. उमेश चौधरी, डॉ.गणेश भारंबे, डॉ.सुनील चौधरी, डॉ.व्ही.जे.वारके, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.दत्तप्रसाद दलाल, डॉ.संगीता महाजन, रावेर व यावल या परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.विलास चौधरी, सचिव डॉ.पराग पाटील, खजिनदार डॉ.राजेश चौधरी, सदस्य डॉ.भरत महाजन, डॉ.शैलेश खाचणे, डॉ.नितीन महाजन, डॉ.ललित बोरोले, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.ताराचंद साळवे, डॉ.आशिष सरोदे, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.योगेश पाटील, डॉ.गौरव धांडे, डॉ.दिलीप भाटकर, डॉ.प्रफुल पाटील, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.निलेश पाटील डॉ.अभिजीत सरोदे, डॉ.प्रशांत भारंबे, संदीप भारंबे, कन्हैया चौधरी आदीनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !