खंडव्यात रेल्वेचा ब्लॉक : आठ रेल्वे गाड्या रद्द

रेल्वे प्रवाशांची पुन्हा गैरसोय : आठ गाड्या उशिराने धावणार


Railway block in Khandwa : Eight trains cancelled भुसावळ  : खंडवा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी प्री नॉन इंटरलॉकिंग तसेच खंडवा-अकोला-रतलाम या गेज परिवर्तनाच्या कामासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला असून विविध कामे या काळात केली जाणार आहे. 5 ते 22 जुलैदरम्यान ही कामे चालणार असल्याने या काळात आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या उशिराने चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

5 ते 22 जुलैदरम्यान या आठ रेल्वे गाड्या रद्द
ट्रेन क्रमांक 01092 खंडवा-सनवाद मेमू, ट्रेन क्रमांक 01091 सनावद-खंडवा मेमू, ट्रेन क्रमांक 05685 खंडवा-बीर शटल, ट्रेन क्रमांक 05686 बीर-खंडवा शटल, ट्रेन क्रमांक 05689 खंडवा-बीर शटल, ट्रेन क्रमांक 05690 बीर-खंडवा शटल, ट्रेन क्रमांक 05691 खंडवा-बीर शटल, ट्रेन क्रमांक 05692 बीर-खंडवा शटल 5 ते 7 जुलैदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

आठ गाड्या उशिराने धावणार
ट्रेन क्रमांक 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस 9 रोजी 2.30 तासांसाठी तर ट्रेन क्रमांक 22177 मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस 9 रोजी अडीस तास उशिराने धावणार आहे. ट्रेन क्रमांक 12720 हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस 9 रोजी 2.25 तासांसाठी तर ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस 9 रोजी 90 मिनिट उशिराने धावणार आहे. 11 जुलै रोजी ट्रेन क्रमांक 07651 जालना-छपरा विशेष एक्स्प्रेस 2.45 तासांसाठी तर ट्रेन क्रमांक 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस 2.30 तासांसाठी, ट्रेन क्रमांक 22177 मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावणार आहे. ट्रेन क्रमांक 12720 हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस प्रवास 11 रोजी रोजी 2.30 तासांसाठी व ट्रेन क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस 90 मिनिटांसाठी उशिराने धावणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !