मुक्ताईनगर मतदारसंघात होणार चुरशीची लढत

आमदार एकनाथराव खडसेंची भूमिका महत्त्वाची ठरणार


नाना पाटील

बोदवड  जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आता राजीनामा सत्र सुरू आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला असून लवकरच नवीन कार्यकारिणी निवडण्यात येार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघाचा विचार गेल्यास आगामी काही महिन्यात येथे निवडणूक होणार असून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याशी तूल्यबळ लढत होणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत उमेदवार श्रीराम पाटील यांना लीड मिळवून देण्याची ग्वाही देणार्‍या रोहिणी यांना मात्र शब्दपूर्ती करता आलेली नाही त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभा निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे.


राष्ट्रवादी उमेदवाराचा दारुण पराभव
लोकसभा निवडणुकीत उद्योजक श्रीराम पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते मात्र त्यांना मुक्ताईनगरसह मतदारसंघात 50 हजारांचा लीड मिळवून देण्यात अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना अपेक्षित यश आले नाही मात्र भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांना 46 हजार 929 मतांचा लीड मिळाला तर बोदवड तालुक्यात तीन हजार दोनशे मतांचा लीड रक्षा खडसेंना मिळाला. बोदवड तालुक्यात अ‍ॅड.रवींद्र पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे सोबत असूनही राष्ट्रवादी उमेदवाराला अपेक्षित मतदान मिळवता आले नाही. उशिराने मिळालेली उमेदवारी शिवाय पक्षातील अंतर्गत भानगडी आदींमुळे श्रीराम पाटील यांना अपेक्षित यश मिळाले नाही हेदेखील तितकेच खरे !

खडसेंच्या ताकदीने रक्षा खडसेंचा विजय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांचा भाजपात प्रवेश बाकी असलातरी त्यांनी खासदार स्नुषा रक्षा यांच्यासाठी ताकद पणाला लावली. कुठलेही सभा न घेता केवळ कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याद्वारे त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यामुळे आगामी काही दिवसात होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही कन्या अ‍ॅड.रोहिणीला निवडून आणण्यासाठी ते ताकद निश्चित पणाला लावतील यात शंका नाही.

चुरशीची होणार विधानसभा निवडणूक
काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आणली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अ‍ॅड.रवींद्र पाटील व अ‍ॅड.रोहिणी खडसे इच्छुक आहेत तर महाविकास आघाडी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील उमेदवार निश्चित आहेत मात्र आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांचे वैर जगजाहीर आहे तर दुसरीकडे अद्याप खडसेंचा भाजपा प्रवेश झालेला नाही. अशा परिस्थितीत आमदार खडसे हे विधानसभा निवडणुकीत मुलीला निवडून आणण्यासाठी ताकद लावतील हे स्पष्टच आहे व या निवडणुकीत कोण विजयी होणार हे आजच सांगणे अशक्य आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !