यावल वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.नितीन चौधरी


यावल : यावल न्यायालयात वकील संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात संघाच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते अ‍ॅड.नितीन चौधरी यांची सचिवपदी अ‍ॅड. प्रकाश चौधरी यांची तर ग्रंथपाल म्हणून अ‍ॅड.शेखर तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. बिनविरोध निवडीचा पायंडा यंदादेखील कायम राहिला.

नवीन कार्यकारिणीचे गठण
यावल तालुका वकील संघाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये तालुका वकील संघाची कार्यकारणी नव्याने गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून यावल शहरातील अ‍ॅड.नितीन एम.चौधरी यांची तर सचिवपदी अ‍ॅड.आकाश आप्पासाहेब चौधरी (रा.फैजपूर) व ग्रंथपालपदी अ‍ॅड.शेखर सुजात तडवी (किनगाव) यांची निवड करण्यात आली. बैठकीमध्ये माजी अध्यक्ष एस.आर.लोंढे, माजी सचिव याकुब तडवी, अ‍ॅड.एस.जी.कवडीवाले, पी.आर.गडे, जी.एम.बारी, अजय कुलकर्णी, खलील शेख, किशोर सोनवणे, अशोक सुरळकर, उमेश बडगुजर, निवृत्ती पाटील, के.डी.पाटील, एस.एस.कुलकर्णी, मोहित शेख, धीरज चौधरी, निलेश मोरे, देवेंद्र बाविस्कर, दत्तात्रय सावकारे, रितेश बारी, विनोद परतणे, सुलताना तडवी, गौरव पाटील, देवकांत पाटील, फैजल शेख, स्मिता कवडीवाले, मोनिका सावकारे, हेमांगी चौधरी, डिंपल सुरळकर सह वकील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !