आडगाव येथील माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेचा तीन लाखांसाठी छळ


यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेचा पतीसह सहा जणांनी छळ केला. माहेरून पतीला कार घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावे, असा तगादा लावण्यात आला व पैसे न आणल्याने विवाहितेचा शारीरीक व मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून देण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
आडगाव येथील माहेर असलेल्या शबनम रोशन तडवी (30) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीला कार घेण्याकरीता माहेरून तीन लाख रुपये आणावे यासाठी पती रोशन तडवी, सासु रशीदा तडवी, रफिक तडवी, आशा तडवी, मुनाफ तडवी व हिना तडवी या सहा जणांनी तिचा छळ केला. पैसे न आणल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला माहेरी सोडून देण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिसात सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !