मंडळे निहाय शिबिर घेण्यात यावे : आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये अनुदानाचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी सरकारचा मानस असून मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर बोदवड व रावेर तालुक्यातील मंडळेनिहाय शिबिरे घेऊन ही योजना व्यापक स्वरूपात राबवावी, अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर बोदवड व रावेर तहसीलदारांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत. या योजनेसाठी पात्र लाभार्थी महिला भगिनी या योजनेपासून कोणत्याही कारणास्तव वंचित राहू नये यासाठी काळजी घेतली जाणार असून शिवसेनेसह आमदार चंद्रकांत पाटील यांची कार्यकर्त्यांची फळी देखील ग्राउंड लेव्हलला काम करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.





