भुसावळात इनरव्हील रेलसिटीतर्फे वृक्षारोपण


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी कडुनिंब, अर्जुन, साल, करंजा, बदाम, रोहिडा, वड, पिंपळ, पिलिया,
ताम्हण, बेहडा, जांभूळ आणि बेल आदी ऑक्सीजन देणारी झाडे लावण्यात आली. वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची निगा राखण्याचे पालकत्व तेथील विद्यार्थ्यांनी घेतले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी क्लबच्या नूतन अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जवळे आणि इतर क्लब सदस्य सुनीता पाचपांडे, सीमा सोनार, वैशाली महाजन, डॉ.मृणाल पाटील, विनीता नेवे, मोना भंगाळे, रेवती मांडे, अनिता महाजन, जयश्री चौधरी, हेमलता सोनार, डॉ.किर्ती चांदवडकर, प्रतीक्षा पाटील, किरण मुळे उपस्थित होत्या. हा प्रक्लप यशस्वी करण्यासाठी क्लब अध्यक्षा, सचिव तसेच प्रोजेक्ट चेअरमन संध्या वराडे यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !