भुसावळातील तरुणीला धमकावले : नगरसेवकाविरुद्ध गुन्हा


भुसावळ शहरातील घटना : नगरसेवक राज खरातसह तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा : घटनेनंतर पोलिसांचे कोम्बिंग

भुसावळ : सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या तरुणीला नगरसेवक राज उर्फ सनी खरात याच्यासह अन्य दोघांनी धमकावत शिवीगाळ केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 3 मार्च रोजी सायंकाळी पावणेसात वाजता आरपीडी रोडवरील पंजाबी मशिदीसमोर ही घटना घडल्यानंतर आरोपीने तरुणीच्या घरी येवून घराच्या गेटचे नुकसान केले. दरम्यान, पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत कोम्बिंग ऑपरेश राबवले मात्र हाती काही लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशीरा खरात यांना चौकशीकामी ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तरुणीच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा
तक्रारदार राजेश्री राजधर सुरवाडे (रेल्वे हॉस्पीटल मागे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 3 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता पंजाबी मशिदीसमोर आरोपी राज खरात सह अन्य दोघा अनोळखींनी अडवत रवींद्र खरात यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी मयुरेश सुरवाडे यांच्या आई व भावाचा पत्ता व फोन नंबर द्यावा अन्यथा परीवाराला ठार मारेल, अशी धमकी दिली. आपल्याजवळ पत्ता व फोन नंबर नसल्याचे सांगितल्याचा खरात याला राग आल्याने त्याने माझ्या वडीलांचा वाढदिवस 6 एप्रिलला असून त्यापूर्वी मला नंबर मिळाला पाहिजे अन्यथा मी तुझे वडील, तुझा भाऊ व तुझ्या परीवारास जिवे ठार मारेल अशी धमकी आरोपींनी दिल्याचे सुरवाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर राजेश्री या घरी आल्यानंतर संशयीत आरोपी तेथे आले व शिवीगाळ करीत दरवाजाच्या गेटला लाथा मारल्याने 500 रुपयांचे नुकसान झाले.




चौकशीकामी नगरसेवक ताब्यात
पोलिसांनी मंगळवारी रात्रीच नगरसेवक राज खरात यास शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यानंतर डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी चौकशी केली व रात्री त्या सोडले. यावेळी रजनी खरात यांच्यासह त्या परिसरातील नागरीक सुध्दा पोलिस ठाण्याजवळ गोळा झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !