दीपनगरात लोखंडी प्लेटा चोरीचा प्रयत्न : तिघांविरोधात गुन्हा


भुसावळ : दीपनगरातील कोळसा हाताळणी विभागाजवळील लोखंडी टॉवरजवळून साडेसात हजार रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा चोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षक आल्यामुळे फसला. ही घटना 6 रोजी दुपारी 2.10 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात फेकरीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
कुणाल लहू वाघोदे (38, दीपनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत नशीर शहा जनाब शहा, पवन (दोन्ही रा.फेकरी) व अन्य एक अनोळखी शनिवारी दुपारी 2.10 वाजता दीपनगरातील कोळसा हाताळणी विभागाजवळील लोखंडी टॉवरजवळून साडेसात हजार रुपये किंमतीच्या पाच लोखंडी प्लेटा नेत असताना सुरक्षा रक्षक आल्याने संशयीतांनी लोखंडी प्लेटा जागीच सोडून पळ काढला. याप्रकरणी तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !