आम्ही भुसावळचे दादा म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला : चौकडीविरोधात गुन्हा


भुसावळ : आम्ही भुसावळचे दादा असून आम्हाला नमस्कार (सलाम) करावा लागत म्हणून चौघांनी तरुणांवर प्राणघातक हल्ला केली. ही घटना शहरातील पापा नगर भागात 30 जून रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे हल्ला प्रकरण
शेख कासीम शेख सलीम (23, काझी प्लॉट, भुसावळ) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, जुन्या वादाच्या कारणातून 30 जून रोजी सकाळी 10.30 वाजता पापा नगर भागात शेख दानिशने रस्ता अडवून शिविगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. जाता-येता तुला आम्हाला सलाम करावा लागेल, हम यहाँ के दादा है म्हणत दुसरा संशयीत शेख अकिलने हातातील लोखंडी सळई फिर्यादीच्या डोक्यात मारली. अन्य दोन संशयीतांनी शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी आरोपी शेख अकील शेख रशीद, शेख दानिश शेख अकिल, शेख शोएब शेख अकिल, शेख रईद शेख रशीद (पापा नगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कांतीलाल केदारे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !