केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा यावल शहरात सन्मान
यावल : रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा युवक कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांचे शहरात मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच आगमन झाल्यानंतर भाजपाच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंत्री रक्षा खडसे या चोपडा येथे कार्यक्रमास जात असतांना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विनंतीला मान देऊन त्या यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर स्वागत स्विकारण्यासाठी काही वेळ थांबल्या होत्या. यावेळी माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख सागर चौधरी, हेमराज फेगडे, भूषण फेगडे, सरचिटणीस गोविंदा बारी, योगेश चौधरी, सचिन मोरे, उज्वल कानडे, अनिकेत सोरटे, मनोज बारी, दीपक फेगडे, आकाश कोळी, सचिन राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
समस्या सोडवण्याच्या सूचना
मंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून यावल तालुक्यातील समस्यांविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर विविध शासकीय कार्यालयांशी संबधित अधिकार्यांशी त्यांनी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करीत तातडीने समस्याचे निराकरण करण्याविषयी सुचना दिल्या.





