जळगाव कारागृहात कैद्याचा खून : जेल कर्मचार्याचे निलंबन
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अंतर्गत वादातून झालेल्या खूनप्रकरणात जेल कर्मचार्याला निलंबित करण्यात आले ओ असल्याची माहिती मध्यवर्ती कारागृहाचे आयजी जालिंदर सुपेकर यांनी दिली. या प्रकरणात संबधित अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जेलमध्ये झाला कैद्याचा खून
भुसावळ येथील तत्कालीन भाजप नगरसेवक रवींद्र उर्फ हप्प्या खरात यांच्यासह पाच जणांच्या खून खटल्यामध्ये आरोपी असलेले पाच आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत मात्र कैद्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू असल्याने 10 रोजी सकाळी या प्रकरणातील आरोपी मोहसीन असगर खान (34) याच्यावर आरोपी शेखर मोघे याने हल्ला करून त्याचा खून केला. याप्रकरणी जेल कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी जळगाव मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी त्यावेळेस बॅरेक नंबर तीन व चार जवळ ड्युटीवर असलेला जेल कर्मचारी गणेश पाटील याला निलंबित केले तर अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले की, या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता दोनशे जणांची आहे. मात्र इथे 400 वर कैदी ठेवण्यात आलेले आहेत.

