आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील विकास कामांसाठी अर्थसंकल्पात 156 कोटी निधी मंजूर !

वरखेडे धरण, पांझण डावा कालवा व मन्याड पाटचारी दुरुस्तीसाठी निधीची भरीव तरतूद झाल्याने सिंचन क्षमता वाढणार !


MLA Mangesh Chavan’s efforts approved 156 crore funds in the budget for development works in the taluka! चाळीसगाव : विधानसभा पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा 156 कोटी इतका भरीव निधी मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे. विशेषतः तालुक्यातील सिंचन, रस्ते, पूल, शासकीय इमारत आदी सर्वच विभागात निधी मिळाल्याने सिंचन क्षमता वाढणार असून दळण-वळणाला गती मिळणार आहे. त्यात विशेषतः तालुक्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या कामाला 100 कोटी, गिरणा धरणावरील पांझण डावा कालवा दुरुस्ती साठी 19 कोटी 54 लाख तसेच मन्याड धरणावरील मन्याड उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामांना 14 कोटी 56 लाख असा भरघोस निधी मिळाला आहे.

वरखेडे धरणासाठी निधी
वरखेडे धरणाच्या 100 कोटी निधीचा वापर धरणाच्या बंदिस्त पाईपलाईन काम तसेच तामसवाडी गावाचे पुनर्वसन आदी कामांसाठी करता येणार आहे. यासोबतच पांझण व मन्याड कालव्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने जवळपास दोन आवर्तने कमी होऊन शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे देखील अवघड झाले आहे त्यामुळे या दोन्ही कालव्यांची ठिकठिकाणी दुरुस्ती, सिमेंट अस्तरीकरण केले जाणार असल्याने शेतकर्‍यांना 1 आवर्तन अधिक मिळण्यात मदत होणार असल्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतीक्षेत्राचे सिंचन वाढणार असल्याची माहिती चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.


सरकारचे मानले आभार
आपल्या मागणीवरून भरघोस अश्या निधीची तरतूद केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !