भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील गुन्ह्याला लागणार मोक्का : पोलिसांकडून महानिरीक्षकांकडे प्रस्ताव रवाना
Bhusawla double murder crime to face Mokka : Police send proposal to Inspector General भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे, सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडाच्या दाखल झालेल्या गुन्ह्याला पोलीस प्रशासनाकडून मोक्का कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यावर नवीन कलम लागणार आहे.
मोक्कानंतर दाखल होणार चार्जशीट
बारसे व राखुंडे हत्याकांडाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल आहे. या दाखल गुन्ह्याला संघटीत गुन्हेगारीसाठी वापरला जाणारा मोक्का कायदा पोलीस प्रशासनाकडून या गुन्ह्याला लावला जाणार आहे. त्याचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या गुन्ह्याला मोक्का अर्थात संघटीत गुन्हेगारीसाठी वापरला जाणारा कलम लागणार आहे. या गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कलम लावूनच आता न्यायालयात चार्टशीट पाठविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या संशयितांना लागणार मोक्का कलम
या गुन्ह्यातील संशयीत राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, करन पथरोड, नितीन पथरोड व त्याच्या सोबतचे तीन जण अश्यांवर हा मोक्का कलम अर्थात संघटीत गुन्हेगारी हा कलम लावला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शहरात अश्याप्रकारे असलेल्या संघटीत गुन्हेगारी विरूध्द सुध्दा या कायद्याचा वापर करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंजुरीची प्रतीक्षा
संघटीत गुन्हेगारी हा कलम या गुन्ह्याला लावण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे नाशिकला प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर तत्काळ या गुन्ह्यात हा कलम वाढविला जाणार असल्याने प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा आहे.
